प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आषाढी वारीचे औचित्य साधून साहित्यसंपदातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील आणि विविध स्तरांतील साहित्यप्रेमी व नवोदित कवी-लेखकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
साहित्यसंपदाचे संस्थापक वैभव धनावडे यांनी स्पर्धकांचे आभार मानत निकाल जाहीर केला. स्पर्धेत प्रथम क्रमांक अरुण द. म्हात्रे, द्वितीय क्रमांक अनिता गुजर आणि तृतीय क्रमांक हेमा जाधव यांनी पटकावला. तर उत्तेजनार्थ पुरस्कार राजेश्वरी अंबिके आणि माधुरी इनामदार यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कै. शशिकांत पुराणिक स्मृती प्रित्यर्थ देण्यात आला.
कार्याध्यक्ष मयूर पालकर आणि कार्यवाहक वैशाली कदम यांनी कै. अनंत महादेव शेडे स्मृती प्रित्यर्थ पुरस्कारांची घोषणा केली. या गटात कविता झुंजारराव यांनी प्रथम, सुचित्रा कुंचमवार यांनी द्वितीय आणि चंदा वाडकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर दीपा वणकुद्रे आणि करुणा शिंदे यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावले.
स्पर्धेस लाभलेल्या प्रचंड प्रतिसादाची दखल घेत आयोजकांनी काही विशेष पारितोषिकांचीही घोषणा केली. कै. मनोहर नेवगी स्मृती प्रित्यर्थ विशेष पुरस्कारांत वर्षा वराडे फटकाळे यांनी प्रथम, माधुरी बर्वे यांनी द्वितीय आणि देवयानी म्हंकाळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अर्चना माने आणि संध्या यावडकर यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.
स्पर्धेच्या समन्वयक म्हणून अर्चना गोरे यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. सर्व विजेत्यांना रोख रक्कम तसेच डिजिटल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण अपेक्षा बिडकर आणि स्मिता पेशवे यांनी केले. स्पर्धकांच्या लेखनशैलीचे त्यांनी कौतुक करत, अशा साहित्यिक उपक्रमांमुळे नवोदितांना व्यासपीठ मिळते आणि सृजनशील समाजनिर्मितीस निश्चितच चालना मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या