मिरज, दि. २७ ऑगस्ट : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, मिरज येथे संस्कृत दिन, रक्षाबंधन आणि इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची 'कृषी' पाठानिमित्त क्षेत्रभेट असे तीनही उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, सामाजिक मूल्ये आणि अनुभवाधारित शिक्षणाचा अनोखा संगम अनुभवता आला.
संस्कृत दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सौरभ आवटी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे महत्त्व आणि मोलाचे मार्गदर्शन केले. संस्कृत भाषा जपावी, संस्कृत भाषा टिकावी आणि संस्कृत भाषा जाणून घ्यावी तसेच संस्कृत चा भाषेचा आदर करावा असे सांगितले. विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक, सुभाषिते, संवाद, गीते आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे संस्कृत भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेविषयी प्रेम आणि अभिमान निर्माण झाला. संस्कृत दिनाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मनोज लिम्बिकाई आणि अमोल लिंबेकाई यांनी मार्गदर्शन केले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी परस्परांना राखी बांधून बंधुभाव, प्रेम, विश्वास आणि एकतेचा संदेश दिला. भारतीय संस्कृतीतील सणांचे सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना या उपक्रमातून प्रभावीपणे समजले.
याच दिवशी सामाजिक शास्त्र विषयातील 'कृषी' या धड्याच्या अनुषंगाने इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, सांगली येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आधुनिक शेती, विविध पिके, कृषी प्रयोगशाळा आणि कृषी संशोधनाची प्रत्यक्ष माहिती घेतली. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून दिली, त्यामुळे पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.विद्यार्थ्यांसाठी ही कृषी क्षेत्रभेट अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली. पाठ्यपुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शेती, पर्यावरण आणि कृषी संशोधनाविषयीची जिज्ञासा अधिक वाढली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळते, असा विश्वास शाळेने व्यक्त केला. विद्यार्थ्यांबरोबर अर्चना सातपुते,वैशाली पाटील आणि स्वाती मंगसुळे तसेच समन्वयिका अश्विनी येळकर आणि चंद्रशेखर मिराजे यांनी या कृषी क्षेत्रभेटीचा अनुभव घेतला.
या सर्व उपक्रमांना शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली हार्डी प्रशासक रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर आणि समन्वयिका अश्विनी येळकर यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकवृंद आणि समन्वयकांनी उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन करून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला.
ज्ञान, संस्कार आणि अनुभवाधारित शिक्षण यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारे हे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, आनंददायी आणि संस्मरणीय ठरले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेविषयी प्रेम आणि अभिमान निर्माण झाला. या उपक्रमासाठी शाळेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त ॲड .वीरेंद्र पाटील समन्वयक सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या