सांगली : भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि संरक्षणाच्या वचनाचा सण असलेल्या रक्षाबंधनाला सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकीची जोड देत भाजपा महिला मोर्चा, सांगली शहर जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या संकल्पनेतून ‘एक पेड भाई के नाम’ हा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक सणाला पर्यावरण संवर्धनाची दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या संकल्पनेला भरभरून दाद दिली.
‘अध्यात्माकडून संस्कृतीकडे… संस्कृतीकडून पर्यावरणाकडे!’ या विचारातून साकारलेल्या या उपक्रमामागे अत्यंत सुंदर आणि संवेदनशील संकल्पना आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहिणीने दोन राख्या बांधाव्यात एक आपल्या भावाच्या मनगटावर आणि दुसरी
एखाद्या झाडाला. भावाच्या मनगटावरील राखी प्रेम,आपुलकी आणि संरक्षणाचे नाते दृढ करणारी, तर झाडाला बांधलेली राखी निसर्गाच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याची जाणीव करून देणारी ठरली.
झाडाला राखी बांधणे ही केवळ एक प्रतीकात्मक कृती न राहता, त्या झाडाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पारंपरिक भावनेला सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची अर्थपूर्ण जोड मिळाली.
‘एक राखी भावासाठी… एक राखी झाडासाठी… आणि एक संकल्प उद्याच्या हिरव्या भविष्याकरिता!’ हा संदेश देत महिला मोर्चाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यात आली. नात्यांचे संरक्षण करणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणातून आता निसर्गाच्या संरक्षणाचा धागाही बांधला जावा, ही या उपक्रमामागील व्यापक भावना आहे.
स्वातीताई सुशांत खाडे यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून सण साजरा करण्यासोबतच समाजाला एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न झाला आहे. केवळ वृक्षारोपण न करता, लावलेल्या झाडाशी भावनिक नाते निर्माण करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याची कल्पना हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
या उपक्रमाला महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच सामान्य महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत झाडांना राख्या बांधल्या आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. रक्षाबंधनाच्या सणातून प्रेम, संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणारा ‘एक पेड भाई के नाम’ हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आणि प्रेरणादायी ठरला आहे.
राखीच्या धाग्यातून निसर्गाशी नाते जोडणारी ही संकल्पना म्हणजे सणाला सामाजिक भान देणाऱ्या सकारात्मक उपक्रमाची सुंदर सुरुवात असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
एक पेड भाईके नाम किंवा एक मूल एक झाड किंवा झाडे लावा झाडे जगवा वगैरे नुसते इव्हेंट आहेत. यातून तसे काहीच निष्पन्न होत नाही. एक झाड रोपट्याचे वृक्षात रुपांतर होण्यासाठी किमान पन्नास वर्षे लागतात.हा काही थोडा कालावधी नाही. अख्खे आयुष्य निघून जाते.आणि तुम्ही लावलेले झाडांचे पुढे काय होते हे कोणी बघत असेल असे वाटत नाही.म्हणून आता जी वृक्षसंपदा आहे तिचे संरक्षण करण्याची आपल्याकडे जी योजना असायला हवी आहे ती आपल्या कडे नाही म्हणून ही नाटके केली जातात.
उत्तर द्याहटवा