प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ :
गगनबावडा : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग सध्या प्रवाशांसाठी 'मृत्यूचा सापळा' बनला आहे. कळे ते सांगशी दरम्यान रस्ता दुरुस्तीसाठी शासनाने मंजूर केलेला साडेसहा कोटी रुपयांचा निधी अवघ्या १५ दिवसांत पाण्यात गेला आहे. असगाव ते सांगशी दरम्यान रस्त्याची झालेली चाळण, निकृष्ट काम आणि अपघातांच्या मालिकेच्या निषेधार्थ सोमवारी तिसंगी येथे गगनबावडा तालुका कृती समिती, वाहनधारक, शेतकरी, व्यापारी व विविध संघटनांच्या वतीने सुमारे तासभर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले.
येत्या सात दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी या वेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
१५ दिवसांत कोट्यवधींची धूळधाण; आपत्कालीन सेवांनाही अडथळा
कळे ते सांगशी दरम्यान खड्डे बुजवण्यासाठी आणि पॅचअपसाठी साडेसहा कोटींचा निधी मंजूर झाला होता. मात्र, ठेकेदाराने भर पावसात अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याने अवघ्या १५ दिवसांतच रस्ता पुन्हा पूर्णपणे उखडला आहे. शेनवडे व असलज गावांजवळ रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे महामार्गाला चिखलमय पानंदीचे स्वरूप आले आहे.
दररोज हजारो प्रवासी, नोकरदार, शेतकरी आणि पर्यटकांची या मार्गावरून वर्दळ असते. मात्र, खड्ड्यांमुळे प्रवासाचा वेळ दुप्पट झाला असून वाहनांचे सस्पेंशन व टायर फुटून चालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन सेवांनाही या खड्ड्यांचा मोठा फटका बसत आहे.
दंडासाठी कॅमेरे तत्पर, मग खड्डे का अदृश्य?
आंदोलकांनी प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर तीव्र शब्दात ताशेरे ओढले:
तंत्रज्ञानाचा वापर वसुलीपुरताच? रस्त्यांवर कॅमेरे बसवून वाहनधारकांवर काही सेकंदांत दंडात्मक कारवाई करणारी यंत्रणा, रस्त्यांवरील हे जीवघेणे खड्डे सुधारण्याच्या बाबतीत मात्र पूर्णपणे अपयशी ठरली आहे.
कागदावरचा कायदा: २०१९ च्या मोटार वाहन कायद्यानुसार, खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून १ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र, भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे.
निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यात खालील मागण्या करण्यात आल्या:
कायमस्वरूपी दुरुस्ती: महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने दर्जेदार पद्धतीने बुजवून उखडलेल्या भागाची पुनर्बांधणी करावी.
सुरक्षा व पाणी निचरा: पाणी साचणाऱ्या ठिकाणी योग्य गटारी बांधाव्यात, धोकादायक वळणांवर रिफ्लेक्टर्स, इशारा फलक लावावेत आणि रस्त्यालगतची झाडेझुडपे हटवावीत.
दोषींवर कारवाई: निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी.
पारदर्शकता: रस्ता कामांचे नियोजन करताना स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांना विश्वासात घ्यावे तसेच शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
खड्ड्यात बसून लोकप्रतिनिधींचे आंदोलन!
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अत्यंत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. पंचायत समितीच्या सभापती छाया देसाई, सदस्य अमर कांबळे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली पाटील, माजी सभापती बंकट थोडगे, प्रकाश मेंगाणे आणि प्रकाश पाटील यांनी महामार्गावरील पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्यात बसून आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनाने उपस्थितांचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
प्रशासनाचे आश्वासन :
"कळे - गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील सर्व खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबविण्यात येतील."
– एस. व्ही. रासने (उपकार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर)

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या