प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तालुकास्तरीय रोटरी क्लब ऑफ तासगाव आयोजित वक्तृत्व स्पर्धेत चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाची छाप पाडली. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ईश्वरी अनिल माईनकर हिने द्वितीय क्रमांक, स्वरा मिलिंद खंडागळे हिने तृतीय क्रमांक, तर समर्थ महेश टेके याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.यशस्वी विद्यार्थ्यांना शिल्ड, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.दरम्यान, जिल्हास्तरीय गुलमोहर वक्तृत्व स्पर्धेतही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. मोठ्या गटात वृंदा विशाल खेराडकर हिने तृतीय क्रमांक, तर वैष्णवी रवींद्र गुरव हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. मध्यम गटात परिमल संतोष टिळे हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. लहान गटात समर्थ महेश टेके व धनराज सूरज जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून यशाची परंपरा कायम राखली.जिल्हास्तरीय स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनाही शिल्ड, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक होत असून, या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या