सांगली: सांगली संस्थानच्या राजेसाहेब हिज हायनेस श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त केपीज चेस अकॅडेमी आणि गणपती पंचायतन संस्थान,सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली भव्य 'एकदिवसीय 16 वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा २०२६' रविवारी (23 जुलै) अत्यंत उत्साहात पार पडली.
सांगली येथील ऐतिहासिक श्री.गणपती मंदिर येथे हेरंब हॉल मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा अश्या जिल्ह्यासह विविध भागांतून तसेच कर्नाटक राज्यातून आलेल्या एकूण 178 खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ *सांगली संस्थानचे युवराज श्रीमंत आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन, केपीज चेस अकॅडेमी च्या संचालिका आणि आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर* तसेच गणपती पंचायतनचे व्यवस्थापाक,श्री जयदीप अभ्यंकर, राकेश दोड्डनावर तसेच इतर सदस्य, पदाधिकारी आणि केपीज चेस अकॅडेमी चे इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
*23 जुलै रविवार रोजी पार पडलेल्या सांगली येथील 16 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत केपीज चेस अकॅडेमी चा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू वरद पाटील हा 7.5 गुणांसहित स्पर्धेचा विजेता ठरला.*
कोल्हापूर चा अभय भोसले उपविजेता ठरला. कोल्हापूरच्याच सर्वेश पोदार ने तिसरा क्रमांक पटकविला.
स्पर्धेतील विजेता, उपविजेता आणि त्रितिय क्रमांक पटकवणारे सर्व खेळाडू सांगलीच्या केपीज चेस अकॅडेमीचे खेळाडू आहेत.
इतर यशस्वी खेळाडू.
वेदांत बांगड - इचलकरंजी,
सारा हारोळे - सांगली,
शिवेंद्रसिंह शिंदे - सांगली
आशिष मोटे - सांगली
अद्विक फडके - सांगली
कर्वे सिद्धी - कोल्हापूर
प्रभाकर बडिगर - कर्नाटक.
सचिन पूजेरी - कर्नाटक
अर्णव पोर्लेकर - कोल्हापूर
हर्ष धनवडे - मिरज
सौमित्र केळकर - सांगली.
मंथन शाह - सांगली.
*वयोगटातील विशेष प्रविण्य प्राप्त खेळाडू -*
*6 वर्षाखालील वयोगट* -
रुहाण अत्तार - सांगली
कुबडगे चिन्मय - सांगली
खिरुगडे रियांश - सांगली
कणसे गनराज - सांगली
सान्वी कुलकर्णी - सांगली
*8 वर्षाखालील वयोगट* -
आरव पाटील - सांगली
परी पाटील - सांगली
अत्तार रिधान - सांगली
ह्रियांश कोतवाल - सांगली.
मालगोदार रिया - कर्नाटक.
*10 वर्षाखालील वयोगट*
साळुंखे अनिरुद्ध - सांगली
जोशी ओजस - कोल्हापूर
गडकरी विदित - सांगली
कुंभार गौरव - सांगली
माडोली प्रणिता - सांगली
*12 वर्षाखालील वयोगट*
देशपांडे माधवी - सांगली
पाटील पृथ्वीराज - सांगली
आराध्य ठाकुरदेसाई - कोल्हापूर
शिंदे श्रीजीत - कोल्हापूर
कुलकर्णी सुबोध - कोल्हापूर
*14 वर्षाखालील वयोगट*
पिंपरकर मिहीर - सांगली
पाटील वरद संदीप - मिरज
मुके रुचित - सांगली
शेख हसन - कर्नाटक
पाटील ओम - सांगली
*सर्वोत्कृष्ट अकॅडेमी* -
केपीज चेस अकॅडेमी, सांगली.
लेफ्टनंट जनरल थोरात अकॅडेमी, सांगली.
शांतीनिकेतन निवासी शाळा, सांगली
आदर्श चेस अकॅडेमी, कर्नाटक
सर्व विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केपीज चेस अकॅडेमीचे सदस्य आणि गणपती पंचायतन संस्थानाचे राकेश दोड्डानावर, तसेच संपूर्ण सदस्य, पदाधिकारी व मार्गदर्शकांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर यांनी काम पहिले
तर इतर पंच म्हणून शाहरुख कुरणे, नाझिया पटेल,अनिता भोसले, सपना उपळावीकर, पुराणिक, प्रशांत जाधव यांनी काम पहिले.
या क्रीडा उपक्रमामुळे स्थानिक बुद्धिबळ खेळाडूंना मोठे प्रोत्साहन मिळाले असून, सांगलीकरांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या