कवठेमहांकाळ / प्रतिनिधी : मळणगाव, बोरगाव, खरशिंग, अलकूड (M), शिरढोण, लांडगेवाडी, देशिंग, विसापूर, हातनूर, पेड पेड, वज्रचौडे, गव्हाण, उपळावी, मणेराजुरी, सांबरवाडी, काकडवाडी अशा अनेक गावांमध्ये आजपर्यंत गोरगरीब, दीनदलित व गरजू रुग्णांची प्रामाणिकपणे आरोग्य सेवा करणारे आरोग्य सेवक श्री. तानाजी सुबराव जमदाडे यांना त्यांच्या अतुलनीय सेवेचे फळ मिळाले आहे.
कोव्हिड-19 च्या महामारी काळात जीवाची पर्वा न करता झोकून देऊन रुग्णसेवा केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले होते. आजपर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी कर्तव्य बजावले, त्या-त्या ठिकाणी त्यांनी समाधानकारक व उल्लेखनीय आरोग्य सेवा दिली.
तानाजी जमदाडे यांनी गेल्या १८ वर्षांपासून आरोग्य सेवक म्हणून ग्रामीण भागात लसीकरण अभियान, माता-बाल आरोग्य, स्वच्छता आणि साथरोग नियंत्रण यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. या प्रामाणिक व निस्वार्थ सेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कवठेमहांकाळ येथे आरोग्य सहाय्यक या पदावर पदोन्नती दिली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या