प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
सांगली : विश्रामबाग येथील लोकशिक्षण मंडळ संचलित, देशभक्त नाथाजी लाड शाळेत Intensified IEC Campaign 2026 अंतर्गत ICTC Mobile Van, सांगली यांच्या वतीने HIV/AIDS जनजागृती व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या अंजली पाटील (MSW) आणि अशोक मठपती हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक सचिन लाड यांनी केली.
यावेळी अंजली पाटील यांनी व्यक्ती एच. आय. व्ही. पॉझिटिव्ह होण्यामागील कारणे, त्याचा STI आणि इतर गुप्तरोगांशी असलेला संबंध, तसेच रक्त नमुना तपासणीचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच A.R.T. - Anti Retroviral Treatment म्हणजे काय, HIV मुक्त होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी आणि HIV पासून दूर कसे राहावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. मदतीसाठी १०९७ हा राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार महादेव सानप यांनी मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापक सचिन लाड, संस्था खजिनदार ए. पी. लाड, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या