सांगली : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग आयुक्तालयांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, सांगली यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘उत्कृष्ट उद्योजक जिल्हास्तरीय पुरस्कार’ आयडीयल इंडस्ट्रीज, सांगलीच्या संचालिका सौ. अंजली शिंदे व संचालक श्री. अरुण शिंदे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रदान करण्यात आला.
जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, उद्योजकतेला चालना देणारे कार्य आणि व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या संधींची दखल घेत आयडीयल इंडस्ट्रीजच्या संचालकांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिका आयुक्त श्रीमती संगीता महापात्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल नरवाडे तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक डॉ. विद्या कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पुरस्कारामुळे आयडीयल इंडस्ट्रीजच्या कार्याची जिल्हास्तरावर विशेष दखल घेतली गेली असून, उद्योजक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नव्या पिढीतील उद्योजकांसाठीही हा सन्मान प्रेरणादायी ठरला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या