सांगली, दि. १५ : पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. अमित कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविद्यालय परिसरात सुमारे १०० देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. अमित कुलकर्णी यांनी देशी वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित केले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटते हरित क्षेत्र लक्षात घेता प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सांगली विभागीय अध्यक्ष श्री. नारायण आपटे, विभागीय सचिव डॉ. आशिष पुराणिक, डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. महेंद्र बागुल, डॉ. विजय साळुंखे, डॉ. गणेश सिंहासने, पर्यवेक्षक सी. एस. कुलकर्णी, अनुप कुलकर्णी, श्री. दीपक बाचल, रवींद्र कोरे, श्री. शेखर शिंदे, श्रीमती मयुरा देवधर, श्रीमती जयश्री कोपर्डे, भास्कर पाटील, अविनाश पवार, सचिन माळी, अशोक पवार यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महाविद्यालयाने हरित परिसर उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या