प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तासगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले .
यावेळी तासगाव शहराध्यक्ष दिनेश पवार, विनोद पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा सरचिटणीस तानाजीराजे जाधव यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दिनेश पवार म्हणाले, दादा सर्वांना हवे हवे असताना आपल्यातून निघून गेले आज खर तर त्यांचा वाढदिवस होता परंतु दुर्दैवाने त्यांची जयंती करावी लागत आहे. दादांनी कार्यकर्त्यांना उभे केले. बळ दिले आणि विकासाच्या वाटा दाखविल्या. शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविणे संदर्भात आम्ही त्यांना भेटलो होतो परंतु त्यांच्या जाण्याने सगळ्या गोष्टी मागे राहिले आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हेच त्यांना अभिवादन ठरेल.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या