प्रतिष्ठा न्यूज
तासगाव : महाराष्ट्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरगाव विसापूर येथे ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रतापनाना पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ प्रताप नाना पाटील म्हणाले, अजितदादा हे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखी झालं पाहिजे यासाठी ते अहोरात्र काम करत होते. अत्यंत कठोर पण शिस्त असणारे अजितदादा तितकेच हळव्या मनाच्या होते. कार्यकर्त्यांच्या अडचणीसाठी नेहमी ते धावून यायचे.
यावेळी शिरगाव येथील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या