सांगली, प्रतिनिधी : वन सप्ताहानिमित्त १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली ( संलग्न) आणि चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रिमझिम पावसाच्या साक्षीने पार पडलेल्या या उपक्रमामुळे कार्यक्रमाचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि आजच्या काळातील वृक्षलागवडीची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यानंतर महाविद्यालय परिसरात विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागातून विविध प्रकारच्या फळझाडांसह अनेक वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाबरोबरच झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही कृषी विद्यार्थ्यांनी स्वीकारली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी किशोर चंदुरे, प्राध्यापिका अश्विनी कांबळे, सारिका पाटील, अबोली पिंजरकर, डॉ. अमृता खांडेकर, रवी कोरे तसेच विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी आदित्य कोठावळे (GS), मयुरी वावरे (LR), मारुती वाघमोडे (SS), समृद्धी सोकाशी (CS), शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
सर्वांच्या सक्रिय सहभाग आणि सहकार्यामुळे वन सप्ताहातील वृक्षारोपण उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या