सांगली : सांगली (जिल्हा) नगरवाचनालयातर्फे डॉ. गणेश लिमये यांच्या आर्थिक सहकार्यातून मे महिन्याच्या सुट्टीत आयोजित करण्यात आलेल्या कै. भा. का. लिमये स्मृती “जास्तीत जास्त पुस्तके वाचा” वाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता करण्यात आले आहे. हा समारंभ ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुभाष कवडे (भिलवडी) यांच्या प्रमुख उपस्थितीत तर डॉ. रोहन ठाणेदार (सांगली) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, अधिकाधिक पुस्तके वाचण्याची प्रेरणा मिळावी आणि वाचन संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. स्पर्धेतील गुणवंत स्पर्धकांना या कार्यक्रमात पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक तसेच शालेय शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या वाचनप्रेमाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांगली (जिल्हा) नगरवाचनालयाचे कार्यवाह श्री. सुहास करंदीकर यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या