सांगली प्रतिनिधी : ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ठिक - १०:०० वाजता सांगली जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींनी आपल्या न्याय मागण्या व हक्कांसाठी शंभर टक्के शाळा बंद ठेवून भव्य धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरनाथे यांनी केले आहे, अशी माहिती सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे सहसरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील मध्यवर्ती शिक्षक संघटना, सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक भारती, शैक्षणिक व्यासपीठ, उर्दू शिक्षक संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग,प्रहार शिक्षक संघटना,जय जौहार आदिवासी विकास संघटना,बहुजन शिक्षक संघटना,राज्य राष्ट्रीय पुरस्कार,एम ए एम एड कृती समिती,जुनी पेन्शन संघटना,खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना,मुख्याध्यापक शिक्षक संघ,पदवीधर शिक्षक संघटना,कास्ट्राईब शिक्षक संघटना,दिव्यांग शिक्षक संघटना,पुरोगामी शिक्षक संघटना,पालक संघटना व इतर सर्व प्राथमिक- माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे.
टीईटी सक्ती,पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ शिक्षकांवर होणारा अन्याय,SIR मॅपिंग तसेच अन्यायी संचमान्यता धोरण माध्यमिक शिक्षणात शिक्षकांच्या विविध मागण्या, उर्दू शाळांतील विविध प्रश्न तसेच शासनाच्या अनेक जाचक धोरणा विरोधात ९ जुलै २०२६ रोजी “राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन” करण्यात येत आहे.
आंदोलनात सांगली जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना सहभागी झाल्या आहेत.
सांगली जिल्हा सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने काल दिनांक - ७ जुलै २०२६ रोजी समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरणाथे सहसरचिटणीस शशिकांत पाटील, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत बजबळे,जगन्नाथ कोळपे जुनी पेन्शनचे अमोल शिंदे, संघाचे अमोल माने, कृष्णा पोळ, विकास चौगुले इत्यादी शिक्षक नेत्यांचे उपस्थितीत सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ,जिल्हा परिषद सांगली चे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य,शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना भव्य धरणे आंदोलना संदर्भात निवेदन दिले आहे.
प्रशिक्षणात सहभागी शिक्षकां साठीप्रशिक्षण एक दिवसाने पुढे ढकलण्यात येणार आहे,अशी माहिती समन्वयचे अध्यक्ष महेश शरणाथे यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या