प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीचे ज्येष्ठ टपाल तिकिटे आणि प्रख्यात व्यक्तींच्या स्वाक्षर्यांचे संग्राहक गजानन पटवर्धन यांना पुणे येथे " पुणे पेशन्स आयकान पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम दि.५जुलै २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड ईथे उत्साहात पार पडला.
प्रामुख्याने पुणे स्थित राहणार्या छांदिष्ट व्यक्तींसाठी स्पर्धा होती. एकूण आलेल्या ६०० अर्जांची छाननी करून त्यातील निवडक अशा १५ विभागात १०८ लोकांची निवड केली त्यासाठी संयोजकांनी त्यांच्याकडून ऑडिशन चाचणी सुद्धा घेतली होती .पटवर्धनांची त्या मधून "Collections " ह्या विभागात निवड झाली हे विषेश म्हणावे लागेल. त्यांना मान्यवरांच्या हस्ते रेकक्गनिशन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.ह्या कार्यक्रमासाठी अनेक प्रायोजक होते सकाळ माध्यम पुणे ह्यांनी पुढाकार घेतला होता.
गजानन पटवर्धन हे गेली अनेक वर्षे त्यांचा विविध छंद मनापासून जोपासत असून विद्यार्थी, मुले पालक यांना विविध प्रदर्शना मधुन प्रोत्साहन देत असतात.जागतिक वारसा आणि ठेवा, तसेच संस्कृती जतन करण्यासाठी ते कटिबध्द आहेच ,पटवर्धन यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारा बरोबर अनेक पुरस्कार मिळाले असून अनेक जागतिक विक्रमांच्या पुस्तकात त्यांची नोंद आहे. त्यांच्या स्वाक्षरी छंदाची "लंडन बुक आफ वल्ड रेकार्ड मध्ये नोंद आहे हे विषेश आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या