सांगली प्रतिनिधी : अभिजीत भोसले याने जून मध्ये झालेल्या 29 व्या सिनियर राष्ट्रीय स्पर्धा रांची ह्या स्पर्धेत डेकाथलॉन खेळप्रकारात 7100 पॉइंट्स करत स्वतःची सर्वोत्तम कामगिरी करीत ४ क्रमांक मिळविला व त्याचबरोबर चीन येथे होणाऱ्या पहिल्या 23 वर्षांखालील आशियाई स्पर्धेसाठी क्वालिफिकेशन सुद्धा केले. पहिल्या 23 वर्षांखालील आशियाई स्पर्धा या 9 जुलै ते 12 जुलै ऑर्डोस चीन येथे होणार असून तो व ॲथलेटिक्स ची भारतीय टीम चीन साठी रवाना झाली आहे. अभिजीत हा भारतीय वायुसेने मध्ये कार्यरीत आहे. प्रोत्साहन म्हणून संस्थेचे अध्यक्ष मकरंद चितळे कार्याध्यक्ष जतीन शहा उपाध्यक्ष संजय परमणे राजू बावडेकर खजिनदार प्रमोद शिंदे यांचे प्रोत्साहन मिळत आहे तर तंत्रशुद्ध मार्गदर्शन एस एल पाटील व अविनाश सावंत यांचे मिळत आहे.
सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनचा राष्ट्रीय खेळाडू अभिजीत संजय भोसले याची ऑर्डोस, चीन येथे होणाऱ्या पहिल्या 23 वर्षांखालील आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
By -
जुलै ०७, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या