पलूस प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या मोहिते वडगाव येथील विद्यार्थी विकास विद्यालयामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांच्या हस्ते गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रदीप आप्पा कदम म्हणाले, "शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहशी आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, या उद्देशाने समिती सातत्याने विविध विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घ्यावे, मोठी स्वप्ने पाहावीत आणि कठोर परिश्रमाच्या बळावर आपले भविष्य घडवावे. समाजातील सक्षम घटकांनीही गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे."
या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गणवेश व शालेय साहित्य स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजयदादा शिंदे, रणजीत शिंदे, अभिजीत कौलगे, अंकुश राजमाने, महेश हजारे, तुषार सूर्यवंशी, राहुल पाटील, अभिजीत सावंत, माजी सरपंच विजय मोहिते, सरपंच शितल मोहिते, सोमेद परीट तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव माने यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या