दोंडाईचा : दोंडाईचा येथील श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे म्हणाले, "गुरु हे केवळ ज्ञानच देत नाहीत, तर संस्कार, कौशल्य आणि जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन देऊन शिष्यांचे जीवन समृद्ध करतात."कार्यक्रमात प्राचार्य डॉ. पी. झेड. झांबरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त तयार केलेल्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. चेतना दातेराव, उमा पाटील, जयश्री ठाकूर, मोहिनी सोनार, अजय पवार व प्रियंका पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. गणेश पारखे यांनी गुरुपौर्णिमा प्रतिज्ञा दिली. प्रा. अमृता चव्हाण व प्रा. एस. एम. ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रेवती बागुल, सूत्रसंचालन नेहा राजपूत, तर आभार दीपमला भामरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पी. डी. बोरसे, प्रा. आर. पी. पाटील, प्रा. डॉ. योगिता चौधरी, प्रा. पी. एल. खाचणे, प्रा. बी. टी. शेजाळ, प्रा. मंजुषा बावने, प्रा. निशा ठाकूर तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या