प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ.ज्योती सचिन कोळी यांनी नगराध्यक्षांकडे लेखी निवेदन देत प्रभागातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.प्रभागातील सर्वच मार्गांवर व्यापारी,नागरिक,शालेय विद्यार्थी आणि वाहनचालकांची मोठी वर्दळ असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.या समस्येबाबत यापूर्वीही प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नगरसेविका कोळी यांनी केला आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रभाग क्र.५ मधील सर्व खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी,अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या