सांगली प्रतिनिधी दि. ३० जुलै : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत निर्माण झालेल्या विविध अडचणींच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. नाम. श्री. जयकुमार गोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
मगळवार दि. २८ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याबाबत मंत्री महोदयांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनात बदली प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे, तांत्रिक अडचणी दूर करणे, पात्र शिक्षकांना न्याय देणे आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्याची मागणी करण्यात आली होती.
निवेदनाची दखल घेत ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. नाम. श्री. जयकुमार गोरे साहेब यांनी बुधवार दि. 29/07/2026 रोजी संबंधित विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली. बैठकीत शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रश्न, रिक्त पदांची स्थिती, तांत्रिक त्रुटी, नविन शिक्षक भरती यांची सविस्तर मांडणी केली.
मान. मंत्री महोदय यांनी बदली प्रक्रियेविषयी येणाऱ्या अडचणी याबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासित केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शासन स्तरावर या विषयाची गंभीर दखल घेण्यात आली असून, आंतरजिल्हा बदलीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो शिक्षकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष श्री. राजेश सुर्वे, रायगड जिल्हा कार्यवाह श्री. विजय पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील तसेच राज्यातील शिक्षक परिषद पदाधिकारी,अनेक जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, तालुका पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या