सांगली, दि. ३१ : भारतीय जनता पक्ष जैन प्रकोष्ठाच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र विभाग आणि सांगली जिल्हा शहरातील महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नवनियुक्त पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रदेश उपप्रमुख समीर शहा यांचा भाजपा जैन प्रकोष्ठाचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच सांगली जिल्हा शहर सचिवपदी नियुक्त झालेल्या दर्शन गणे यांचा जिल्हा शहराध्यक्ष महावीर पाटील यांनी सत्कार करून नियुक्तीपत्र सुपूर्द केले.
पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रदेश उपप्रमुखपदी समीर किरण शहा (फुरिया), मिरज यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी केली आहे. तसेच सांगली जिल्हा शहर भाजपा जैन प्रकोष्ठाच्या सचिवपदी दर्शन भूपाल गणे यांची नियुक्ती जिल्हा शहराध्यक्ष महावीर पाटील यांनी केली.
या नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर सांगली येथील स्वदेशी व्हिला येथे भाजपा जैन प्रकोष्ठाची बैठक पार पडली. आगामी ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या भाजपा जैन प्रकोष्ठाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या नियोजनावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे येथील पदाधिकारी व सदस्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक पूर्वतयारीचा आढावाही घेण्यात आला.
या प्रसंगी अमित चिंचवाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत संघटन विस्तार, आगामी उपक्रमांचे नियोजन आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या