प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेला लोकसहभागाची जोड देण्यासाठी व सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून व्यापक जनचळवळ उभारण्याच्या उद्देशाने "विकसित सांगली २०४७ परिसंवाद " रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ७.३० या वेळेत वेलणकर सभागृह, विलिंग्डन महाविद्यालय, विश्रामबाग, सांगली येथे आयोजित करण्यात आला होता.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत विकसित सांगली अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. या विषयाच्या व्याप्ती साठी, विकसित सांगली अभियानासाठी लोकसहभाग या पुस्तक निर्मितीचे काम सुरु आहे. पुस्तक निर्मिती पूर्व विषय तज्ञ यांच्या गटचर्चेसाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित विलिंग्डन महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात जिल्ह्यातील पर्यावरण, आरोग्य, नैसर्गिक शेती, उद्योग, ग्रामविकास आदी क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य सिध्देश्वर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नितीन देशमाने अध्यक्षस्थानी उपस्थितीत होते. तसेच सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे अध्यक्ष विजय वरुडकर, प्रकाश ( तात्या ) बिरजे, प्राध्यापक दत्तात्रय एडके, माधव कुलकर्णी, चेतन गोरे, डॉ राम लाडे, दीपक बाबा शिंदे, डॉ भालचंद्र साठे, नगरसेवक
केदार खाडीलकर, श्रीधर कुलकर्णी, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार इतर १०० पेक्षा अधिक विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थितीत होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजय वरूडकर म्हणाले विकसित भारत उदिष्ट पूर्तीसाठी विकसित ग्राम, विकसित जिल्हा केंद्र ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे.
परंतु वर्तमान जागतिक युद्धाची परिस्थिती, कोरोना जन्य परिस्थिती नंतर निर्माण झालेल्या समस्या, देशात ३० टक्के नापीक होणाऱ्या जमिनींचे संकट, व दरवर्षी पंधरा लाख पेक्षा अधिक कॅन्सरग्रस्त होणारे रुग्ण, तर १ कोटी २० लाख पेक्षा अधिक वाढणारी लोकसंख्या व त्यांना अपेक्षित संसाधन, रोजगार अशा अनेक समस्यां आपल्या समोर आहेत.
या समस्यांच निवारण करण्यासाठी शासकीय योजना, प्रशासकीय यंत्रणा या सोबत लोकसभागाची आवश्यकता आहे. असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य सिद्धेश्वर जाधव यांनी उद्घाटन पर भाषणात विकसित सांगली अभियानात शिक्षण, कला क्रीडा, इतर ही विषयांचा समावेश करावा अशी मागणी केली.
कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रॅम सारख्या योजनेमधून विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग विकसित सांगली अभियाना मध्ये होऊ शकतो असे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रकाश तात्या बिरजे म्हणाले की दीनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदय ही संकल्पना पूर्णत्वास न्यायची असेल तर विकसित सांगली अभियाना सारख्या व्यासपीठाची आवश्यकता आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे.
या अभियानात समाजातील विविध घटकांनी आपले योगदान देऊन आपल्या शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहभाग घ्यावा असं त्यांनी नमूद केले.
परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असलेले नितीन देशमाने जी यांनी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिकांचे कर्तव्य, सामाजिक समरसता, पर्यावरण, स्वदेशी जागरण, स्वबोध, कुटुंब प्रबोधन, या विषयावर स्वयंसेवकांनी कार्यरत व्हावे हा संदेश दिला आहे. विकसित सांगली अभियानातील निवडलेले हे विषय प्राथमिक टप्प्यातील पाच पैलू आहेत दर तीन महिन्याला अशाप्रकारे सांगलीतील विषय तज्ञांनी एकत्रित येऊन लोकसहभाग कसा वाढवला जाऊ शकतो याविषयी चिंतन करण्याची गरज आहे.
माझे राष्ट्र माझे कर्तव्य या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या ब्रीदवाक्यप्रमाने प्रत्येक नागरिकांनी हे राष्ट्र आपले आहे व या राष्ट्रासाठी आपले योगदान कर्तव्य स्वरूप पासून आपण दिले पाहिजे तरच प्रत्येक गाव शहर व पर्यायाने देश विकसित होईल असे त्यांनी सांगितले.
महादेव कुलकर्णी उद्योग, चेतन गोरे शेती, श्रीधर कुलकर्णी ग्रामविकास, डॉक्टर राम लाडे आरोग्य, व कीर्ती जगदाळे पर्यावरण यांनी विषय प्रमुख म्हणून काम पाहिले
प्राध्यापक महादेव थोंबरे यांनी सूत्र संचालन केले तर शुभदा रसाळ,
राकेश तामगावे, शुभम देसाई, सारंग केळकर, अनिता क्षीरसागर, आदित्य मोहिते, विवेक पाटील इतरांनि कार्यक्रमाचे संयोजन केले.
या परिसंवादामध्ये "विकसित सांगली अभियानातील लोकसहभाग" या प्रस्तावित पुस्तकासाठी विविध विषयांवरील तज्ज्ञांचे विचार, सूचना आणि लेख संकलित करण्यात आल्या.
पर्यावरण संरक्षण, आरोग्य, नैसर्गिक शेती, उद्योग, ग्रामविकास आणि नागरिकांचा सहभाग या विषयांवर सखोल चर्चा झाली असून, विकसित सांगली २०४७चा लोक सहभागावर आधारित कृती आराखडा तयार करण्यासाठी या परिसंवादातून लेख संकलित करण्याचे नियोजन करण्यात आले.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, उद्योजक, शेतकरी, स्वयंसेवी संस्था, युवक आणि जागरूक नागरिकांनी या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे आपले व्हिजन आम्हाला कळवावे,
या अभियानात सहभागी होण्यासाठी आथवा अधिक माहितीसाठी ७५८८९५४५८०, ८४८३८०१६८२ या क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन विकसित सांगली अभियान समन्वयक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या