सांगली प्रतिनिधी : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेवरून, काल पेठ नाका सर्विस रोड खड्डे बुजवण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले.
तसेच पाऊस थांबल्यानंतर रस्ता तातडीने व्यवस्थित करण्याची हमी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांनी दिली.
काल पेठ कराड हायवे वर, पेठ येथील सर्व्हिस रोड वर पावसामुळे खूप मोठे खड्डे पडले होते.
संपूर्ण रस्त्यावर पावसाचे पाणी साठल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे नुकसान होत होते. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा गाड्यांचा ताफा तिथून गेला. त्यावेळी एकंदर रस्त्याची अवस्था आणि वाहनधारकांचे होणारे हाल बघून त्यांनी तातडीने नॅशनल हायवे अथोरिटी चा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या रस्त्याचे काम तातडीने करण्याचा आदेश दिला.
त्यानंतर लगेचच हायवे ऑथॉरिटीच्या कर्मचाऱ्यांनी रातोरात त्या रस्त्याचे काम पूर्ण करून, साठलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था केली तसेच संपूर्ण रस्ता खड्डे भरून व लेव्हल करून वाहतूक योग्य केला.
पाऊस थांबल्यानंतर पूर्णपणे तो व्यवस्थित दुरुस्त करून घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.
तातडीने काम केल्याबद्दल वाहनधारकांच्या मध्ये समाधान व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या