सांगली, दि. १ (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील सर्व कलावंत, तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, छायाचित्रकार, संपादक, संगीतकार व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची विशेष बैठक रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता सर्किट हाऊस, माधवनगर रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत कलाकारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असून शासनाच्या योजना, मानधन, पेन्शन, अनुदान, विमा, प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी याबाबत माहिती दिली जाणार आहे. स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न, परस्पर समन्वय, उद्योगनिर्मिती व एक सक्षम, प्रभावी व सर्वसमावेशक कलाकार संघटन उभारणी यावरही विचारमंथन होणार आहे.
बैठकीचे प्रमुख निमंत्रक व शिवसेना – शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी सांगितले की, “कला ही समाजाचे संस्कार व संस्कृती जपणारी शक्ती आहे. कलाकारांचा सन्मान आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम संघटन उभारणे ही काळाची गरज आहे.”कलावंत, तंत्रज्ञ व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या सहकाऱ्यांनाही सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.📍 ठिकाण : सर्किट हाऊस, माधवनगर रोड, सांगली
📅 दिनांक : रविवार, ५ जुलै २०२६
⏰ वेळ : दुपारी १:००
📞 संपर्क : 7821075221
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या