सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे माजी जिल्हाध्यक्ष,कापूसखेड,ता. वाळवा येथील सुपुत्र,शिक्षण चळवळीतील अभ्यासू, प्रामाणिक,शांत व संयमी नेतृत्व म्हणून सर्वपरिचित असलेले माणिकराव पाटील यांच्या सेवापूर्ती अर्जुन पॅलेस, ईश्वरपूर येथे भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करताना संघटनात्मक मूल्ये,तत्त्वनिष्ठा,प्रामाणिकणा आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका जपणारे माणिकराव पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात शिक्षक चळवळीला सक्षम दिशा दिली असल्याचे परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले.
त्यांच्या कार्याचा गौरव करताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी "पद हे क्षणिक असते; परंतु विचार, कार्य आणि माणुसकीच्या बळावर उभे राहिलेले नेतृत्व कायम स्मरणात राहते," अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला.निस्पृह भावनेने शिक्षकांसाठी केलेले संघटनात्मक कार्य माझे कार्यक्षेत्र असलेल्या 58 तालुक्यांच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवागौरव सोहळ्यास वाळवा तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील उर्दूचे प्रतिनिधी मुस्ताक मोमीन, राजेश जोशी,राजेश कोळी,बाजीराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शिक्षक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्यात माणिकराव पाटील यांना संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत सेवापूर्तीनंतरही शिक्षक चळवळ आणि समाजकार्यासाठी त्यांचे मार्गदर्शन असेच लाभत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सेवागौरव सोहळ्याने एका आदर्श, सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ आणि सर्वसमावेशक नेतृत्वाबद्दलचा आदर व्यक्त करत उपस्थितांच्या मनात कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली असल्याचे शिक्षक संघटना समन्वय समितीचे प्रसिद्धी प्रमुख व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या