सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल माननीय मोहनरावजी गायकवाड यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संस्थापक आमदार संजयजी केळकर यांच्या वतीने सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे सहसरचिटणीस,शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी येळावीचे जिल्हा परिषद सदस्य अमित उर्फ विशाल भैय्या पाटील,विख्यात क्रीडा शिक्षक वैभव बंडगर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य अमित उर्फ विशाल भैय्या पाटील यांनी शिक्षणाधिकारी गायकवाड यांचे प्राथमिक कडील काम उठावदार असून तशाच प्रकारचे काम माध्यमिक कडे होण्याबाबत शुभेच्छा दिल्या.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून राबवलेल्या मॉडेल स्कूलची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन राज्यभरामध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे
सदर उपक्रमाचे सादरीकरण शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी नवनियुक्त शिक्षणमंत्री माननीय दादाजी भुसे यांचे पुढे मालेगाव या ठिकाणी केलेले होते.
प्राथमिक शिक्षणाधिकारी सांगली म्हणून सर्व संघटनांशी समन्वय ठेवत अतिशय चांगल्या प्रकारचे कामकाज करीत गुणवत्ता राखण्याचे काम शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी केली असल्याचे शशिकांत पाटील यांनी सांगितले.
माध्यमिककडेही प्रामुख्याने मॉडेल स्कूल मधील योग्य बाबींची अंमलबजावणी,गुणवत्ता विशेषत: पोगंडावस्थेतील मुला-मुलींची सुरक्षितता,सर्वांशी सलोख्याचे संबंध राखत नियमानुकुल प्रशासकीय कामकाजा संदर्भाने शशिकांत पाटील यांनी शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या