मिरज, दि. ५ : प्रोग्रेसिव्ह चेस असोसिएशन, सांगली यांच्या वतीने कै. श्रीमंत उमराजे गंगाधरराव पटवर्धन महाराज बुद्धिबळ स्पर्धा २०२६ चे आयोजन रविवार, दि. १२ जुलै रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा मिरज येथील किल्ला भागातील माधवजी देवालय येथे पार पडणार असून राज्यभरातील बुद्धिबळपटूंचा सहभाग अपेक्षित आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये ठेवण्यात आले असून एकूण ५० हजार रुपयांचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. खुल्या गटात २५ रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच अंडर-७, अंडर-९, अंडर-११, अंडर-१३, अंडर-१५ आणि अंडर-१७ या प्रत्येक वयोगटात १० रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
याशिवाय सर्वोत्तम अनरेटेड खेळाडू, सर्वोत्तम व्हेटरन, सर्वोत्तम सांगली, सर्वोत्तम मिरज, विशेष दिव्यांग खेळाडू आणि सर्वोत्तम अकॅडमी यांनाही विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धा १० मिनिटे + प्रत्येक चालीमागे ५ सेकंद वाढीव वेळ (10+5 Increment) या वेळ नियंत्रणानुसार खेळविण्यात येईल. स्पर्धकांनी सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी अमेय पाटील (९३०९८२९००४) किंवा चंद्रकांत वाळवडे (९९७५९५९०५५) यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेश शुल्क गुगल पेद्वारेही स्वीकारले जाणार आहे.टीप : निमंत्रणातील "Reporting Time : 12/07/2025" ही तारीख मुद्रणदोष असण्याची शक्यता आहे. स्पर्धेची योग्य तारीख १२ जुलै २०२६ अशी आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या