सांगली, दि. ३१ : दैवज्ञ समाज संस्था सांगलीच्या वतीने नाना शंकरशेठ यांच्या १६१व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे नगरसेवक उदय बेलवलकर व नगरसेवक केदार खाडीलकर उपस्थित होते. नगरसेवकांनी संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. विशेष प्राविण्य मिळवलेल्या समाजबंधू-भगिनींचा गौरव करण्यात आला. मधुरा बेलवलकर यांना ‘आदर्श माता पुरस्कार’, मोना बेलवलकर यांना एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये दुसरे स्थान मिळविल्याबद्दल, अनुष्का भुर्के हिला बायो फर्टिलायझरमध्ये गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल, तसेच हेमंत भुर्के, अथर्व पोवळे, अवधूत कडणे व त्रॣचा चोडणकर यांचा सत्कार करण्यात आला.
२५ वर्षांनी दैवज्ञ भवनाचे नूतनीकरण केल्याबद्दल विद्यमान संचालक श्री बाळकृष्ण नार्वेकर, श्री राजेश नार्वेकर, श्री अनिल नार्वेकर, श्री विजय दादा कडणे, श्री दत्तात्रय भाटकर, श्री नितीन कडणे, श्री दीपक चिंदरकर व श्री अनिल दादा गडकरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. युवक अध्यक्ष श्री सच्चिदानंद नार्वेकर व महिला अध्यक्षा सौ. अश्विनी नार्वेकर यांनी समाजातील एकजूट ही आदर्श असल्याचे प्रतिपादन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल गडकरी यांनी सुवर्णकार समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याचे सांगून शासनाने मंजूर केलेल्या विविध योजनांचा लाभ समाजातील वयस्कर व गरजू लोकांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी केली. त्यांनी मुलांना वह्या-पुस्तके वाटप हा केवळ एक भाग असून तरुण व महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मार्गदर्शन करणे हेच या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय दादा कडणे व सौ. प्रिया गडकरी यांनी केले तर सचिनंद्रनाथ नार्वेकर यांनी आभार मानले. समारंभास मोठ्या प्रमाणात दैवज्ञ बंधू-भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या