कोल्हापूर, दि. ३१ : समाजसेवेचा ध्यास आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव या उद्देशाने मच्छिंद्र सादू कांबळे यांनी सावली फाउंडेशनच्या माध्यमातून विविध लोकहिताचे उपक्रम राबविले आहेत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदानासाठी मदत, आरोग्य जनजागृती अशा उपक्रमांनंतर त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. वंचित बहुजन युवक आघाडी, शाहूवाडी यांच्या सहकार्याने विद्या मंदिर, पेंडाखळे येथे शाळेच्या मागणीनुसार शेवगा रोपांचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये "झाडे लावा, झाडे जगवा" हा संकल्प रुजविण्यात आला.या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावजी पाटील, माजी डेप्युटी सरपंच योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते विलास सुतार, प्रकाश कांबळे, बौद्धाचार्य रामचंद्र कांबळे, सागर कांबळे, संदीप पाटील, वंचित बहुजन युवक आघाडीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शेवगा रोपांचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनाची गरज आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. "आज लावलेले एक झाड उद्याच्या पिढीसाठी शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी जीवनाचा पाया ठरेल," हा संदेश देण्यात आला."एक विद्यार्थी – एक झाड, एक कुटुंब – दहा झाडे; हाच हरित महाराष्ट्राचा पाया" तसेच "झाडे लावा... झाडे जगवा... पर्यावरण वाचवा... भविष्य घडवा!" या घोषणांनी वातावरण भारावून गेले.या उपक्रमामुळे समाजात पर्यावरण संवर्धनाची जाणीव दृढ होत असून युवक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत आहे, असे मत मोहन कांबळे (तालुका शाहूवाडी) यांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या