प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:लोढे येथील जय हनुमान विकास सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणुकीत आमदार रोहित आर. पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाने १३-० असा एकतर्फी विजय मिळवत सत्ता कायम राखली.या निवडणुकीत माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाचा पराभव झाला.निकाल जाहीर होताच विजयी गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटांनी सभासदांशी घराघरात संपर्क साधत जोरदार प्रचार केला होता.विविध आश्वासने देत मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी दोन्ही गटांकडून चुरशीचे प्रयत्न सुरू होते.शनिवारी मतदान व मतमोजणी एकाच दिवशी पार पडली.शनिवारी सकाळपासूनच दोन्ही गटांनी सभासदांना घरातून मतदान केंद्रावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. मतदानादरम्यान दोन्ही गटांकडून विजयाचे दावेही करण्यात येत होते.मात्र सायंकाळी सहा वाजता निकाल जाहीर होताच आमदार रोहित पाटील गटाने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळवत एकतर्फी सत्ता हस्तगत केली.यावेळी माजी सरपंच विलास पाटील,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सचिव श्रीनिवास पाटील,लक्ष्मण पाटील,भाऊसो पाटील,गुलाब माने,ईश्वर पाटील,दुर्योधन पाटील, जनार्दन पाटील, रामचंद्र पाटील, कुमार पाटील, आप्पा पाटील, प्रकाश पाटील, मुरलीधर पाटील, शानाबाई घुटूगडे, मोहन पाटील, रघुनाथ भिंगारदिवे, सुभाष पाटील, बाळासो माने, दाजी पाटील, विनोद पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालानंतर विजयी गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या