सांगली, प्रतिनिधी - येथील गुलमोहर व्यायाम संस्थेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त शालेय मुलामुलींच्या साठी वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धांचे हे २७ वे वर्ष असून वक्तृत्व स्पर्धा दि.८ आॅगस्ट रोजी तर पाठांतर स्पर्धा दि.९ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहेत. शालेय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा
सांगली - येथील गुलमोहर व्यायाम संस्थेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त शालेय मुलामुलींच्या साठी वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धांचे हे २७ वे वर्ष असून वक्तृत्व स्पर्धा दि.८ आॅगस्ट रोजी तर पाठांतर स्पर्धा दि.९ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहेत.सर्व स्पर्धा डॉ.बापट बाल शिक्षण मंदिर, सांगली या ठिकाणी होणार आहेत.
स्पर्धेसाठी लहान गट( बालवाडी)-श्री.गणपती स्तोत्र ( साष्टांग नमन हे माझे...), मोठा गट (बालवाडी)-श्री.मारूती स्तोत्र (संपूर्ण), इ.१ली-२री गट - श्री.सूर्यस्तुती (मराठी,१ते१२ संपूर्ण), इ.३ री-४थी गट-श्री.गणपती अथर्वशीर्ष (१ते१० श्लोक)असे पाठांतर स्पर्धेसाठी विषय आहेत. तर इ.५वी६वी गट- लो. बाळ गंगाधर टिळक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माझे स्वप्न,मी केलेली सहल (वेळ ३मि.),इ.७वी८वी गट- लोकमान्य टिळकांची देशभक्ती, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,माझा आवडता लेखक, आॅनलाईन परीक्षा -शाप की वरदान (वेळ ४मि.), इ.९वी१०वी गट- लोकमान्यांचे लोकमान्यत्व, रयतेचा राजा: राजर्षी शाहू महाराज,मातृभाषेचे संवर्धन, भ्रष्टाचाराचा भस्मासूर (वेळ५मि.) असे वक्तृत्व साठी विषय आहेत.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील तीन क्रमांकांना रोख रक्कम,गौरव चिन्ह तर ४ व ५ क्रमांकाच्या उत्तेजनार्थ भेटवस्तू तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक गटातील सांघिक विजेतेपद मिळविणाऱ्या शाळांना ट्राफी देवून गौरविण्यात येणार आहे.प्रवेश शुल्क पाठांतर स्पर्धेसाठी प्रत्येकी रु१०/ - तर वक्तृत्व साठी प्रत्येकी रु२०/- आहे.स्पर्धकांनी आपली नावे शाळेमार्फतच संदिप स्टोअर्स - वसंत प्राथमिक शाळेसमोर, सांगली, सुशांत निकम श्री.राजाराम रं. सारडा प्राथमिक कन्या शाळा,पेठभाग, सांगली व विनायक देशमुख, राणी सरस्वती देवी कन्या शाळा, पेठभाग, सांगली या ठिकाणी दि.४ आॅगस्ट पर्यंत प्रवेश शुल्कासह नोंदवावीत. स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मुलामुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्था कार्यवाह मिलिंद कुलकर्णी, सहकार्यवाह सुशांत निकम, दिपक राऊत यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या