प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज: मिरज तालुक्याच्या प्रशासकीय विकासाला नवे बळ देणाऱ्या मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा भव्य लोकार्पण व उद्घाटन सोहळा आज, रविवार दि. 12 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता पंचायत समिती, मिरज येथे संपन्न होणार आहे.
भारतीय जनता पार्टी, मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. चंद्रकांत (दादा) पाटील हे राहणार आहेत.
या सोहळ्यास खासदार विशाल (दादा) पाटील, आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, आमदार जयंत पाटील, आमदार सुधीर (दादा) गाडगीळ, जयश्रीताई पाटील, माजी आमदार दिनकर (तात्या) पाटील, भाजपा नेते मकरंद (भाऊ) देशपांडे, पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मिरज पंचायत समितीची नूतन इमारत प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम, सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यास महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टी, मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या