सांगली प्रतिनिधी : भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील प्राचार्यपदाचा कार्यभार डॉ. डी. जी. कणसे यांनी नुकताच स्विकारला. या पूर्वी ते मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयात प्राचार्यपदी कार्यरत होते. शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात एक कुशल प्रशासक आणि प्रदीर्घ अनुभव असणारे प्राचार्य म्हणून डॉ. कणसे यांची ख्याती आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषद, तसेच विविध विद्यापीठांचे अभ्यासमंडळ सदस्य म्हणून कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत शिवाजी विद्यापीठाचा 'आदर्श प्राचार्य,' पुरस्कार,भारती विद्यापीठाचा 'सेवागौरव' अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सन २०१३ ते २०२४ या काळात त्यांनी या महाविद्यालयात प्राचार्यपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती.
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. कणसे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या