प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत लोककल्प फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर दिन आणि दिनानिमित्त सांगली परिसरातील डॉक्टर यांचा त्यांच्या समाजोपयोगी आणि व्यावसायिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत डॉ. रविकांत पाटील (चेअरमन, सेवासधन लाइफलाइन हॉस्पिटल), आकाशदीप नेत्रालय . डॉ. उदय पाटील.मिरज), तीर्थराज हॉस्पिटल. डॉ. हर्षल कुलकर्णी, डॉ. कुलभूषण रेवण्णा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
हा सन्मान कार्यक्रम लोकमान्य मल्टिपर्पज को. सो.
रिजनल मॅनेजर- श्री सुदत्त पाठक.
असिस्टंट रिजनल मॅनेजर - बळवंत भालकर.
जनरल मॅनेजर- सुभाष मोरे.
मार्केटिंग रीजनल मॅनेजर- सूरज पाटील.
सीएसआर असिस्टंट - वैभव दाभाडे.
मार्केटींग असिस्टंट अर्जुन देवर्डे.
यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डॉक्टर आणि सीए यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचे महत्त्व अधोरेखित केले.
लोककल्प फाऊंडेशन आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी समाजहितासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत असून, समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
सन्मानित डॉक्टर व यांनी या सन्मानाबद्दल लोककल्प फाऊंडेशन आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या