प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तासगावात 'निषेध सही अभियान' राबविण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून अभियानाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपल्या सह्यांद्वारे निषेध नोंदवला.अभियानादरम्यान अनेक नागरिकांनीही सहभागी होत घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.विद्यार्थ्यांचे आंदोलन,शेतकरी आंदोलन आणि विविध सामाजिक आंदोलनांवर होत असलेल्या कथित दडपशाहीबाबत नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त करण्यात आला.या अभियानासाठी डॉ. बाबुराव गुरव, प्रा. वासुदेव गुरव, प्रा. राजेश रोमन, पांडुरंग जाधव, समीर कोळी, सुधीर नलवडे, अर्जुन थोरात, नूतन परिट, सुजाता म्हेत्रे, विशाल खाडे, सुधाकर कोळी, बाबुराव जाधव, भरत थोरात, दत्तात्रय बामणे, सूर्यकांत शिंदे, ऋतुजा खोत, अमर खोत आदींचे विशेष योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या