प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, सांगली जिल्हा यांच्या वतीने मातोश्री तानूबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल, मिरज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकनेते तथा माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला.
या सामाजिक उपक्रमाला नागरिक, युवक-युवती तसेच महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या भावनेतून अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
यावेळी भाजपा महिला मोर्चा, सांगली जिल्हा अध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले.
या प्रसंगी ज्येष्ठ नेत्या सुमनताई खाडे, मंजिरीताई गाडगीळ, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, नगरसेविका उज्वला कांबळे, अपर्णा शेटे, विद्या नलवडे, योगिता राठोड, रसिकाताई खाडे, ओंकार शुक्ल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे समाजात सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि रक्तदानाविषयी सकारात्मक जनजागृती निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या