प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पक्षाच्या तासगाव तालुका शाखेच्या वतीने सावर्डे येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात तब्बल १०३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस "सेवा यज्ञ" म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार तासगाव तालुका भाजपचे अध्यक्ष ॲड.स्वप्निल पाटील यांच्या नियोजनातून हे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले.या उपक्रमात भाजपचे तालुका व जिल्हा पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते तसेच अनेक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रक्तदानासारख्या सामाजिक कार्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजहिताचा संदेश देण्यात आला.यावेळी भाजपचे उपाध्यक्ष दामाजी डुबल, शशिकांत माने, अजित शिंदे, अमित झांबरे, तानाजी पवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष आशुतोष भोसले, निलेश कुलकर्णी, सुभाष माळी, पोपट हंकारे, कपिल पुजारी, विनय सपकाळ, करण पाटील, सुधीर गवळी, बबन शिंदे, सुषमा लोंढे, इंद्रनील पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ता योजनेच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या सहअध्यक्षपदी ॲड. स्वप्निल पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजप तासगाव तालुक्याच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.भाजपचे जिल्हा सरचिटणीस अनिल लोंढे यांच्या हस्ते त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या निवडीमुळे तालुक्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल,असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या