पलूस प्रतिनिधी : डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून पलूस तालुक्यातील बुर्ली येथे गावातील सर्व डॉक्टरांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय, बुर्ली यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या संकल्पनेतून युवा नेते राहुल पाटील यांनी हा उपक्रम राबविला.
यावेळी डॉ. अशोक होरे, डॉ. राजेंद्र शेंडगे, डॉ. दीपक चौगुले, डॉ. रफिक नदाफ, डॉ. महावीर चौगुले, डॉ. संदीप पवार, डॉ. महेश मिठारी, डॉ. शीतल पाटील, डॉ. प्रणव सुतार, डॉ. सुरेश डिग्रजकर, डॉ. बाबासो कांबळे, डॉ. अविनाश शिंदे, डॉ. विनायक देशमाने, डॉ. प्रज्वल गडदे आणि डॉ. विनायक टोणपे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास राहुल पाटील, अरुण सुतार, मौला इनामदार, सुनील कुंभार, भालचंद्र पाटील, सुरेश शिखरे, प्रकाश सदामते, शंकर खुडे, सूर्यकांत सुतार, संजय पवार, अमित पाटील, गजानन कोरे, प्रशांत सुतार, प्रशांत पाटील, सागर कडोले, अक्षय खुडे, दीपक चौगुले यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना राहुल पाटील म्हणाले, डॉक्टर समाजाच्या आरोग्यसेवेसाठी दिवस-रात्र कार्यरत असतात. त्यांच्या निःस्वार्थ सेवेमुळे समाज निरोगी राहतो. अशा सेवाभावी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करणे आपले कर्तव्य आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या