प्रतिष्ठा न्यूज
विसापूर प्रतिनिधी ::तब्बल बारा वर्षानंतर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक प्रशासनाला गती व गुणवत्ता देण्यासाठी नवनियुक्त 2430 केंद्रप्रमुख नवीन शैक्षणिक संकल्पना व प्रवाहांची प्रभावी अंमलबजावणी करतील असा आशावाद महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी व्यक्त केला
रा.शा.माने-पाटील विद्यालय विसापूर येथे आयोजित नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या शिक्षण परिषदेत ते बोलत होते. शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या निदर्शनात प्रचलित पर्यवेक्षीय यंत्रणा प्रशासनाने दिलेल्या राष्ट्रीय हिताच्या प्रत्येक कामाला विरोध,संघटना पदाधिकाऱ्यांचा उचित सन्मान न राखणे या त्रुटी निर्माण होत असल्याने नव्याने तरुण शिक्षकांना परीक्षेतून नियुक्ती दिल्याचे शशिकांत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या व्यापक शैक्षणिक हितासाठी नवीन दमाच्या महाराष्ट्रात 2430 केंद्रप्रमुख त्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 64 नूतन केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून राष्ट्रीय व महाराष्ट्राच्या नवीन शैक्षणिक संकल्पनांची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हेत्रे सर यांच्या हस्ते शशिकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या मुलांनी स्वागत केले. नियोजन,संयोजन, आभार अमोल उंबरकर, अरुणा पाटील,भारती चव्हाण, दिगंबर कवडे,शितल ऐनापुरे, प्रमोद आवळे, अभिजीत कावळे यांनी केले
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या