सावळज : वातावरणातील बदल तसेच अल निनोचा वाढता प्रभाव यामुळे दरवर्षी जून महिन्यात वेळेवर सुरू होणारा मौसमी पाऊस जून महिना संपून जुलै सुरू झाला तरी खोळंबला असून दर वर्षी मृग नक्षत्रावर होणाऱ्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत आहेत. सावळज परिसरात शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असून आकाशाकडे डोळे लावून दिवस मोजीत बसला आहे त्यामुळे बळीराजापुढे अस्मानी संकटाचे ढग दाटले आहेत.सध्या सावळज व परिसरामध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला तरी असला शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
पावसाअभावी मृगाचा पेरा न होऊ शकल्याने उत्पन्नात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे आज मितीस ही नद्या नाले,विहीरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत येणाऱ्या काही दिवसांत द्राक्षाच्या गोडी बहार पीक छाटणीस सुरवात होणार आहे परंतू परिसरात अजूनही तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे सद्यस्थितीत पेरणी योग्य चांगला पाऊस लवकरात लवकर पडावा व पाणी संकट दूर व्हावे हीच अपेक्षा बळीराजा करीत आहे.
सध्या सावळज व परिसरामध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला असून येथील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या