हातनूर प्रतिनिधी: यावर्षी पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आ. रोहित पाटील यांनी जाहीर केला होता.
देशातील सर्वात युवा आमदारांच्या आवाहनाला साथ देत तासगाव तालुका युवा राष्ट्रवादी अध्यक्ष सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हातनूर मध्ये सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर,मोफत आरोग्य तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.
मांजर्डे जिल्हा परिषद सदस्य मोहन नाना पाटील हातनूर चे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन अण्णा पाटील तालुका अध्यक्ष विश्वास तात्या पाटील ताजुद्दीन तांबोळी, शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील, तासगाव तालुक्यातील पक्षाचे विविध पदाधिकारी व हातनूर मधील व परिसरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
नेतृत्वाच्या 27व्या वाढदिवसानिमित्त वर्षभरात 27 वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले.आजपर्यंत हजारो रुग्णांची रक्तदानाच्या माध्यमातून सेवा ज्यांच्या हातून घडली आहे असे तासगाव तालुका व सांगली जिल्ह्याच्या रुग्णांच्या गळ्यातले ताईत बनलेले तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या माध्यमातून हातनूरमध्ये 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मिरज सेवासदन हॉस्पिटलच्या माध्यमातून वेगवेगळ्या 70 पेशंटची तपासणी करून दहा पेशंटची पुढील शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली यावेळी 100 रुग्णांचे डोळे तपासून 40 गरजू व्यक्तींना चष्मे वाटप करण्यात आले.
तासगाव-कवठेमंकाळ मतदार संघामध्ये गेल्या वर्षभरात कर्जाला कंटाळून दोन शेतकरी बांधवांनी आत्महत्या केली असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचाही आत्महत्येचा आकडा वाढत असल्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा रोहितदादांचा प्रयत्न असल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या