प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी :
सांगली शिक्षण संस्थेच्या हिं. हा. राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगलीच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती व इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा, शिक्षक, पालक व संपूर्ण सांगली शिक्षण संस्थेचा गौरव वाढला आहे.
इयत्ता आठवी (माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा) शहरी गुणवत्ता यादीमध्ये अस्मी अविनाश साखळकर हिने ८९.३३% गुण मिळवत गुणवत्ता यादीत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. आराध्या गणेश वाकसे हिने ८६.६७% गुणांसह तेरावा क्रमांक, तनिष्क शिरीष जगताप याने ८०.६६% गुणांसह ४६ वा क्रमांक, हर्ष रघुनाथ माने याने ८०% गुणांसह ५० वा क्रमांक, गीत राजेश उंटवाल याने ७७% गुणांसह ७५ वा क्रमांक, तर संस्कार संतोष केरेकर याने ७४% गुणांसह १०७ वा क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
इयत्ता पाचवी (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा) शहरी गुणवत्ता यादीमध्ये अस्मी सागर आपटे हिने ७५.३३% गुणांसह ४८ वा क्रमांक, नित्यश्री युवराज भोसले हिने ७३% गुणांसह ११६ वा क्रमांक, उर्वी महेश जामदार हिने ७२% गुणांसह १३३ वा क्रमांक, तर मेहजबिन जमीर सय्यद हिने ६९.३३% गुणांसह १७५ वा क्रमांक प्राप्त केला. त्याचबरोबर इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षा यामध्ये अविनाश साखळकर राज्यात 7 वा क्रमांक व श्रीराज अमोल जोशी याचा राज्यात 24 वा क्रमांक आला आहे. या सर्व परीक्षेसाठी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री केदारी रसाळ,
उपमुख्याध्यापक सौ विनोदिनी मिरजकर,पर्यवेक्षिका श्रीमती वैजयंती सूर्यवंशी, प्रशालेतील सर्व शिक्षक,इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख श्री.हिंदुराव गंगधर यांनी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती व इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षा विभाग प्रमुख सौ.शेरजिल शेख यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹🏆
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या