गगनबावडा: तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ऊस, केळी, भात, नाचणा आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर कष्ट करून जपलेले उसाचे पीक वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे भुईसपाट झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने तहसीलदार गगनबावडा यांना निवेदन दिले.
पंचायत समितीच्या सभापती मा. छाया प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य मा. संभाजीराजे पाटणकर, उपसभापती राजेश पाटील, पं. स. सदस्य अमर कांबळे, तसेच एम. जी. पाटील, एस. के. पाटील, प्रकाश पाटील, विजय वरेकर,लक्ष्मण पाटील, भिवाजी वरेकर, सुरेश खेडेकर, प्रकाश देसाई, सर्जेराव चौधरी, शिवाजी राऊत,सचिन दफडे यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या