प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत तासगाव–कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्राच्या सह-अध्यक्षपदी ॲड. स्वप्निल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली असून,समितीत तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.या नियुक्तीमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पक्ष संघटनेला नवे बळ मिळाल्याची चर्चा आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सह-अध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागाला दर्जेदार शेत व पाणंद रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.विधानसभा स्तरावरील समित्यांमुळे नियोजन,समन्वय आणि अंमलबजावणी अधिक वेगवान होऊन विकासकामांना चालना मिळणार आहे.दरम्यान, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना ही देवेंद्र फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते.या योजनेस कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघातील शेतरस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी या नियुक्तीचा महत्त्वपूर्ण फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या