प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त प्रदेश भाजपच्या निर्देशानुसार तासगाव तालुक्यात २२ जुलै रोजी 'महा रक्तदान अभियान' राबविण्यात येणार आहे. सावर्डे येथील विकास सोसायटीसमोर सकाळी ९ वाजता होणाऱ्या या भव्य रक्तदान शिबिरासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून, तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या अभियानात भाजपचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य,बूथप्रमुख, विविध मोर्चांचे पदाधिकारी,सेल प्रमुख, बीएलए-२ तसेच विशेष कार्यकारी अधिकारी सहभागी होणार आहेत.रक्तदान अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने व कार्यकर्त्याने किमान तीन रक्तदाते कार्यक्रमस्थळी घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तासगाव तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारा हा एकमेव रक्तदान कार्यक्रम असून,मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करून समाजोपयोगी उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी भाजपने व्यापक नियोजन केले आहे.अधिकाधिक रक्तदाते सहभागी होऊन गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध व्हावा,हा या अभियानामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.२२ जुलै रोजी सावर्डे येथे होणाऱ्या या 'महा रक्तदान अभियानाकडे' तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले असून,मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या