प्रतिष्ठा न्यूज
खामगांव :- एकनिष्ठा गौसेवा रक्तसेवा फाउंडेशन नेहमीच प्राणीमात्रांच्या सेवेत तत्पर असून गेल्या काही दिवसात फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी दोन जखमी वन्यजीवांना जीवदान दिले आहे. पहिली घटना - नांदुरा अकोला हायवे, जयपूर लांडे शिवार आठवड्याभरापूर्वी नांदुरा अकोला हायवे, जयपूर लांडे शिवार* जवळ एका *रोह्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक देऊन वाहनचालकाने पळ काढला. अपघातग्रस्त रोह्याला पाहून एकनिष्ठा फाउंडेशनचे कार्यकर्ते अनंता बढे यांनी तात्काळ माहिती दिली. त्यानंतर सुरजभैय्या यादव व वनरक्षक निलेश धारपवार यांनी घटनास्थळी जाऊन जखमी रोह्याला तातडीने उपचारासाठी नेले. डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करून घेतल्यानंतर त्याची प्रकृती सुधारल्यावर त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडून देण्यात आले. दुसरी घटना - गोंधनापूर
तालुक्यातील गोंधनापूर येथे विजेचा शॉक लागून एका माकडाच्या पिल्लाचे मागचे दोन्ही पाय निकामी झाले होते. वेदने तडफडणाऱ्या त्या पिल्लाला पाहून फाउंडेशनचे सक्रीय कार्यकर्ते सुरेंद्र राठोड यांनी तात्काळ माहिती दिली. सुरजभैय्या यादव यांनी वनरक्षक निलेश धारपवार यांच्याशी संपर्क साधून जखमी पिल्लाला आपल्या मोटर सायकलवर वन परीक्षेत्र विभाग, खामगांव शहर येथे आणले. तेथे प्राथमिक उपचार करून डॉ. शुभम जरांगे यांच्याकडून पुढील उपचार करून घेण्यात आले. या प्राणीमात्र सेवाकार्यात सुरजभैय्या यादव, सुरेंद्र राठोड, मोहन देठे, गौरव कवठेकर, शागीर भाई यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपचारानंतर पिल्लाला पुढील देखभालीसाठी वनरक्षक निलेश धारपवार वन कर्मचारी राहुल राठोड यांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या वनविभाग कर्मचारी त्याच्यावर उपचार करत आहेत. दोन्ही घटनांमध्ये एकनिष्ठा फाउंडेशनच्या तात्काळ प्राणीमात्र सेवेमुळे आणि वनविभागाच्या सहकार्यामुळे दोन निष्पाप वन्यजीवांचे प्राण वाचवण्यात यश आले. फाउंडेशनच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे अशी माहिती संतोष आटोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या