सांगली प्रतिनिधी : आकार फाउंडेशन ही संस्था गेले नऊ वर्षे झाले कार्यरत आहे. यामध्ये शैक्षणिक मदत देऊन विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला जातो. या संस्थेमध्ये एकूण 250 विद्यार्थी मदतीचा लाभ घेत आहेत. तसेच तासगाव मध्ये ही 50 मुले शैक्षणिक मदतीचा लाभ घेत आहेत. या शिबिरामध्ये दीडशे मुलांनी सहभाग घेतला होता. आकार फाउंडेशनच्या वतीने गतवर्षी शैक्षणिक वर्षात 7 वी पासून 12 वी पर्यंत व डिप्लोमा डिग्री मध्ये उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ 19 जुलै रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. गिरीश तंगडी अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ सांगली, प्रमुख अतिथी म्हणून मा. यशांग गोकाणी सेक्रेटरी, रोटरी क्लब ऑफ सांगली, तसेच प्रमुख वक्ते म्हणून मा. विनायक माळी विद्योद्य मुक्तांगण परिवार फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी यांची उपस्थिती होती.
आकार फाउंडेशन मध्ये मदत घेणाऱ्या विद्यार्थीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर कॅम्पस इंटरव्यू मध्ये ज्यांना जॉब लागला त्यातील अशा काही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.
गणित विषय विशेष प्राविण्य पारितोषिक विद्यार्थी:-कुणाल धनवे, विराज पाटील, परवेश शेख, आदर्श आवळे, प्रेम सातपुते, संपदा पवार, प्रगती रामपुरे.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी १५ विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा कौतुक करण्यात आले.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थी :
इयत्ता ७ वी हर्षद कुंभार प्रथम क्रमांक,कुणाल धनवे द्वितीय क्रमांक,समीक्षा पारेकर तृतीय क्रमांक,
इयत्ता ८ वी :धनश्री कारंडे प्रथम क्रमांक,
विजयालक्ष्मी माळंगी द्वितीय क्रमांक
इयत्ता ९ वी :आदर्श आवळे प्रथम क्रमांक
परवेज शेख द्वितीय क्रमांक
इयत्ता १० वी : प्रगती रामपुरे प्रथम क्रमांक,प्रेम सातपुते द्वितीय क्रमांक,संपदा पवार तृतीय क्रमांक
डिप्लोमा : सानिका पवार (अंतिम वर्ष) प्रथम क्रमांक,अथर्व नेमिष्टे (प्रथम वर्ष) द्वितीय क्रमांक
मनस्वी हंकारे (प्रथम वर्ष) तृतीय क्रमांक
बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड हा विद्यार्थीची शैक्षणिक प्रगती, व्यक्तिमत्व विकास,शिबिरांना केलेली सर्वांगीण सहभाग, शिस्तबद्ध नियोजन या सर्व गुणांवर व्यंकटेश सिद्धे,श्रेया शिंदे यांना बक्षीस देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने असे उपक्रम राबविण्याचा निर्धार संस्थेच्या उपाध्यक्षा मा. उज्ज्वला परांजपे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजन सानिका पवार व सोनाली पवार यांनी केले. सूत्रसंचालन सानिका पवार व संपदा पवार (विद्यार्थिनी) यांनी केले. आकार फाउंडेशनची प्रस्तावना सुनीता ओलेकर यांनी मांडली. पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन सोनाली पवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकार फाउंडेशनचे विद्यार्थी स्वयंसेवक राधिका पवार, श्रेया शिंदे, संपदा पवार, व्यंकटेश सिद्धे आणि अथर्व नेमिष्टे यांनी मोलाचे सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या