सांगली : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने UPSC व MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे सत्र शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता एकात्मता भवन, गणपती मंदिर, सांगली येथे होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
या मार्गदर्शन सत्रात जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष (भा.प्र.से.), जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरावडे (भा.प्र.से.) आणि सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र (भा.प्र.से.) हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा, अभ्यासाचे नियोजन व रणनीती, वेळेचे व्यवस्थापन, मुलाखतीची तयारी तसेच यशस्वी उमेदवारांचे अनुभव आणि शंका-निरसन यासह स्पर्धा परीक्षांविषयीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना या सत्रातून मिळणार आहे.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन सत्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि प्रेरणा मिळणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
"ध्येय निश्चित करा, परिश्रम करा आणि यश मिळवा" या संदेशातून विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या