सांगली प्रतिनिधी : हैद्राबाद येथील एश टेनिस अकॅडमी येथे झालेल्या १२ वर्षांखालील अखिल भारतीय नेशनल सिरीज लॉन टेनिस स्पर्धेत सांगलीच्या भार्गवी भोसले हिने पुण्याच्या समायरा चौधरी सोबत दुहेरी गटात उपविजेतेपद पटकावले. अखिल भारतीय लॉन टेनिस एसोसिएशन आणि तेलगाना स्टेट लॉन टेनिस एसोसिएशन यांच्या आयोजनाखाली ही नेशनल सिरीज स्पर्धा हैद्राबाद येथे १-६ जुन रोजी पार पडली.
सांगलीच्या भार्गवी आणी समायरा चौधरी (पुणे) स्पर्धेतील उपांत्य सामन्यात अत्यंत सुंदर आणि धाडसी खेळ करत तेलंगणाच्या राफा शेख आणि ऊ.उठला या जोडीचा २-६,६-४,(१०/७) असा पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम लढतीत तेलगणा जोडीकडून संघर्षपूर्ण ६-४,६-१ असा पराभव झाल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ऐश टेनिस अकॅडमी चे स्पर्धा संचालक के. सत्यराम आणि निरीक्षक प्रबिन कुमार नायक यांचे उपस्थित पार पडले. सांगलीची युवा टेनिसपटू भार्गवी भोसले भार्गवी पवन भोसले ही विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल येथे शिकत आहे. ती आमराई ऑफिसर्स क्लब येथे श्रेया पै टेनिस अकॅडमीची खेळाडू असून तिला प्रशिक्षक रविंद्र कदम आणि सोनू तोडू आणि दत्ता पै, तसेच निलेश बाबर याचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या